मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: “द डिसाइपल” या मराठी चित्रपटाला ४५ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘‘एम्प्लिफाई वॉयस अवार्ड’’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगीत क्षेत्रातल्या गुरु-शिष्य परंपरेवर हा चित्रपट आधारित आहे. ख्यातनाम युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
दिग्दर्शक फिलीप लॅकॉट यांच्या “नाइट ऑफ द किंग्स” या चित्रपटाबरोबर हा पुरस्कार काल विभागून देण्यात आला. चैतन्य ताम्हाणे यांच्या “कोर्ट” या मराठी चित्रपटाला याआधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, तो भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: