गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा “द डिसायपल” या मराठी चित्रपटाला व्हेनिस पाठोपाठ टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मानाचा...

“द डिसायपल” या मराठी चित्रपटाला व्हेनिस पाठोपाठ टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मानाचा पुरस्कार प्राप्त

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: “द डिसाइपल” या मराठी चित्रपटाला ४५ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘‘एम्प्लिफाई वॉयस अवार्ड’’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगीत क्षेत्रातल्या गुरु-शिष्य परंपरेवर हा चित्रपट आधारित आहे. ख्यातनाम युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

दिग्दर्शक फिलीप लॅकॉट यांच्या “नाइट ऑफ द किंग्स” या चित्रपटाबरोबर हा पुरस्कार काल विभागून देण्यात आला. चैतन्य ताम्हाणे यांच्या “कोर्ट” या मराठी चित्रपटाला याआधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, तो भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version