पुणे, ३ सप्टेंबर २०२३ : सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे ६२,२७९.७४ कोटी रुपयांनी घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), ICICI बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ITC, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि भारती एअरटेल यांचे बाजारमूल्यांकन गेल्या आठवड्यात घसरले. तर HDFC बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सची बाजारातील स्थिती वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल या आठवड्यात ३८,४९५.७९ कोटी रुपयांनी घसरून १६,३२,५७७.९९ कोटी रुपयांवर आले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य १४,६४९.७ कोटी रुपयांनी घसरून ५,८८,५७२.६१ कोटी रुपये आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य ४,१९४.४९ कोटी रुपयांनी घसरून ४,८४,२६७.४२ कोटी रुपयांवर आले. ITC चे मार्केट कॅप रु. ३,०३७.८३ कोटींनी घसरून रु. ५,५०,२१४.०७ कोटी आणि ICICI बँकेचे मार्केट कॅप रु. ८९८.८ कोटींनी घसरून रु. ६,७८,३६८.३७ कोटी झाले.
TCS चे बाजारमूल्य ५१२.२७ कोटी रुपयांनी घसरून १२,३६,४६६.६४ कोटी रुपयांवर आले. SBI चे मार्केट कॅप ४९०.८६ कोटी रुपयांनी घसरून ५,०८,४३५.१४ कोटी रुपये झाले. याघसरणीच्या उलट HDFC बँकेचे बाजार भांडवल १०,९१७.११ कोटी रुपयांनी वाढून ११,९२,७५२.१९ कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे मूल्यांकन ९,३३८.३१ कोटी रुपयांनी वाढून ५,९८,९१७.३९ कोटी रुपयांवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल ६,५६२.१ कोटी रुपयांनी वाढून ४,४३,३५०.९६ कोटी रुपये झाले.
टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एसबीआय, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड