ठाणे, १५ ऑगस्ट २०२०: भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर लस कधी मिळणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र आता अवघ्या काही दिवसांवर गणेश चतूर्थी आली आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठा या कोरोनामुळे बंद होत्या, मात्र आता गणेशोत्सवामुळे बाजारपेठा या खूल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शूकशूकाट पसरलेल्या बाजारपेठा आता गजबजू लागल्या आहेत.
आजपासून या बाजारपेठा सूरू झाल्याने ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे, त्याच बरोबर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे खरेदी करा, सण साजरा करा, पण नियमांचे पालन करा असे, आवाहन महानगरपालिकेने केले आहे. त्याच बरोबर ठाणे शहरातच नव्हे तर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी देखील बाजारपेठा या कमी जास्त प्रमाणात नियमांचे पालन करत सूरू आहेत. शासनाने सर्व दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खूली केली आहेत, त्यामुळे नागरिकांची गर्दी ही विभागली गेली.
बाजारपेठा सूरू झाल्याने गणपती बाप्पाच्या स्वागताला बाजरपेठा सजल्या आहेत. गणपती बाप्पाच्या सजावटीच्या साहित्यांसोबतच मोदकामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नविन माल हा बाजारात उपलब्ध नाही, आणि जो आहे त्याच्या किमती या जास्त आहेत. त्यामुळे कोरोनामुळे यंदा मोठा फटका ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बसला आहे. मात्र तरी सुद्धा खर्चाचा विचार न करता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सगळे सज्ज आहेत. त्यामुळे बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे