न्यायालयाच्या निर्णया पूर्वीच मंत्रीला सचिवालयाकडून शासकीय कार्यक्रम पत्रिकेत शिवसेनेचा उल्लेख

मुंबई, १२ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर मोठी उलथा पालथ झालेली सर्वांनाच पाहायला मिळाली. शिवसेने मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. आपल्या समर्थक चाळीस आमदारां समवेत मुख्यमंत्री पदही मिळवले. त्यानंतर आपले समर्थक चाळीस आमदार आणि बारा खासदार आपल्या बरोबर असल्यामुळे, त्यांनी शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा केला. परंतु आता मुख्यमंत्री सचिवालयाकडून मुख्यमंत्र्याच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेना पक्षाचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद येथील पैठण मध्ये कार्यक्रमासाठी जात आहेत. या ठिकाणी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे हजर राहणार आहेत. परंतु मंत्री संदीपान भुमरे यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम शिवसेना पक्षाचा कार्यक्रम असल्याचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच आहे असे सांगितले जाते परंतु शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नक्की कोणाची, याचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये अजून प्रलंबित आहे. मात्र आता मंत्रालयातून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय दौऱ्याच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठण येथे सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला जात आहेत. त्यांच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षातून शिंदेंचा शिवसेना पक्ष असा उल्लेख आहे. मुख्यमंत्री सचिवालय अर्थात जनसंपर्क कक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे रूपरेषा असलेले वेळापत्रक प्रसिद्ध केले जात असते. या वेळापत्रकामध्ये ते दुपारी २ वाजता शिवसेना पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती स्थळ कावसानकर स्टेडियम ता. पैठण, औरंगाबाद असा उल्लेख केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा