अल्पवयीन मुलाने केले तिच्या संपूर्ण शरीरावर ब्लेड ने वार

7
उल्हासनगर, २९ मे २०२१: उल्हासनगर मधे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. गेल्या आठवड्या भरात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे. उल्हासनगर मधे एका मुलाने अल्पवयीन मुलीवर ब्लेड ने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे. विशेष म्हणजे वार करणारा मुलगा ही अल्पवयीन असल्याचे कळतय. या घटने मुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर च्या कॅम्प दोन मधे ही धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर च्या चोपडा कोर्ट परिसरातील बाल उद्यानात ही १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बसली असताना तिच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा तिथे आला आणि तिला का बोलण्यास नकार देते म्हणून विचारणा करु लागला. तिथे तरुणीने पुन्हा नकार दिल्यानंतर मुलाने आपल्या खिशातील ब्लेड काढून तिच्या संपूर्ण शरीरावर वार करू लागला.
त्याने मुलीच्या शरीरावर अनेक वार केले ज्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीवर वार करत असताना मुलीने बचावासाठी आराडा ओरडा केला. तेव्हा तिथे गर्दी जमू लागली ज्या नंतर मुलगा तेथून पसार झाला. पण मुलगी रक्ताच्या थारोळ्यात रडत आसल्याचा आवाज एकून एका रिक्षाचालकाने   तिला उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलीवर तेथे उपचार चालू आहेत.
अल्पवयीन मुलाच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याला ताब्यात घेतले आणि बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हे दोघे आधीपासून एकमेकांना ओळखत आसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तेते बोलत भेटत होते पण मध्यंतरी मुलीने कोणत्या तरी कारणास्तव बोलणे बंद केले ज्यामुळे हे कृत्य घडले असे प्राथमिक तापासातून पुढे आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा