माहेरी जाऊ नाही दिले म्हणून जन्मदात्या आईनेच केली दोन मुलींची हत्या

8

उत्तर प्रदेश, ३० ऑगस्ट २०२०: उत्तर प्रदेश भारताचं एक अस राज्य आहे, जिथं रोज काही ना काही घटना, हिंसाचार हा घडत असतात. नेहमीच तिथे गुन्हे घडत असून कोणत्याही प्रशासनाला तेथील गुन्हे थांबविण्यात आत्तापर्यंत फारसे यश आलेले नाही. या सर्व पार्श्वभूमवीर एक ह्रदयद्रावक आणि मन पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आलीये.

पतीने माहेरी जाण्यापासून रोखले, जाऊ दिले नाही म्हणून महिलेने आपल्या पोटच्या मुलींना जीवे मारुन टाकल्याची भंयकर घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या जालौन मधे घडली असून महिलेने चार वर्षीय आणि दहा महिन्यांच्या मुलींची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने आपलं डोकं भिंतीला आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

माहेरी जाण्यासाठी तिचा काही दिवसांपुर्वी नवऱ्याबरोबर वाद झाला होता. ज्यामुळं रागातून तिनं हे पाऊल उचलल्याचं समजलं. या घटनेचा पुढील आधिक तपास हे तेथील स्थानिक पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा