मुंबई, २ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या या महामारीच्या काळात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सतत कार्य करत आहेत. संपुर्ण महाराष्ट्राची मुलांप्रामाणे काळजी घेणारे राजेश टोपे यांना मातृशोक आला आहे.
राजेश टोपे यांच्या आई शारदाताई या गेल्या महिन्यात रुणालयात प्रकृती बिघडल्यामुळे दाखल झाल्या होत्या. त्या नंतर त्या २ महिने घरी राहिल्या आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास शारदाताईंनी आखेरचा श्वास घेतला.
राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना राज्याची परिस्थिती खंबीरपणे सांभाळणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर आई गेल्यामुळे दुखांचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाच्या या काळात सततच्या बैठका आणि आढावे यामधून वेळ काढून राजेश टोपे हे त्यांच्या आईला भेटायचे आणि आपल्या दिवसाची सुरवात कारयचे.
आई बद्दलचा जीवन प्रवास सांगताना राजेश टोपे यांना अश्रू अनावर झाले. करोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे अंतविधी होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तर राजकिय स्तरावरुन या दुख:प्रंसगी सर्वच नेते हे राजेश टोपे यांचे सांत्वन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी