आंदोलन सुरूच ठेवणार…. जलील यांची भूमिका

औरंगाबाद, २ सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिरे उघडण्याबाबत अनेक राजकीय नेते पुढे येत आहे. या माध्यमातून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. तीन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर मध्ये देऊळ उघडण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर काल एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनीदेखील औरंगाबाद मध्ये मंदिर व मस्जिद उघडण्यासाठी आंदोलन सुरू केले.

आज २ ऑक्टोबर रोजी मोदी उघडण्याबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. काल याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट देखील केलं होतं की २ सप्टेंबर रोजी मस्जिद उघडणार व त्यामध्ये प्रवेश देखील करणार. मात्र, आज या आंदोलना दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, “पोलिसांनी जरी अटक केली असली तरी हे आंदोलन असेच पुढे चालू राहणार आहे. आज आम्ही औरंगाबाद पुरते हे आंदोलन करत आहोत, पण पुढे आम्ही पूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू करू. धार्मिक स्थळे उघडून तेथे गर्दी करणारा हा आमचा हेतू नाही परंतु, ठाकरे सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा