मुंबई, ३०,जुलै २०२० : साडेनऊ कोटी लोकांनी दिल बेचारा सिनेमा पहिल्या २४ तासांत पाहिला. विशेष म्हणजे सिनेमाचं तिकीट कमीतकमी १०० रुपये ठरवलं तरी या सिनेमाने पहिल्या २४ तासांत तब्बल ९५० कोटी रुपयांची कमाई केली.अर्थात मल्टिप्लेक्सचा रेट पाहता या कमाईत वाढच होऊ शकते.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आगामी सिनेमावर अनेकांचं लक्ष होतं. दिल बेचारा हा चित्रपट गेल्या २४ जुलैला प्रदर्शित झाल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या होत्या. हे प्रमाण इतकं वाढलं होतं की आयएमडीबी ही वेबसाईटचा सर्वरही काही वेळासाठी क्रॅश झाला होता. हे सगळं झाल्यानंतर गेल्या २४ तासांत नेमके किती व्ह्यू मिळाले या सिनेमाला हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर आता आलं आहे.दिल बेचारा पाहण्यासाठी रसिकांची किती झुंबड उडाली असेल ते या सिनेमाला मिळालेल्या व्ह्यूजवरून लक्षात येतं. या सिनेमाला अवघ्या २४ तासांत तब्बल साडेनऊ कोटी व्ह्यूज मिळाले. साडेनऊ कोटी लोकांनी हा सिनेमा पहिल्या २४ तासांत पाहिला.
या चित्रपटाचा संगीतकार ए.आर.रेहमान याने ट्विटकरून याची माहीती दिली आहे. रेहमानने साडेनऊ कोटी लोकांनी हा सिनेमा पाहिल्याचं सांगतानाच हे ओपिनिंग तब्बल २००० कोटी रुपयांचं झाल्याचं सांगितलं आहे. त्यावरही नेटकऱ्यांचे मतभेद आहेत.अनेकांनी ही रक्कम २००० कोटी होत नसल्याचं सांगितलं आहे. दिल बेचारा हा चित्रपट ओटीटीवर हिट ठरला आहे हे मात्र नक्की. कारण कोणत्याही सिनेमाला यापूर्वी ओटीटीवर इतकं मोठं ओपनिंग मिळालं नव्हतं. सुशांतसिंह राजपूतला आपला हा सिनेमा ओटीटीवर येऊ नये असं वाटत होतं. पण याच ओटीटीने सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाला यश मिळवून दिलं.दिल बेचारा या चित्रपटाचं दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केलं आहे.तर यात सुशांतसोबत संजना संघी या नव्या चेहऱ्याने काम केलं. हा सिनेमा द फॉल्ट इन अवर स्टार्स या हॉलिवूड पटावर बेतलेला आहे.
आयएमडीबीवर दिल बेचाराचा विक्रम…..
सुशांतसिंग राजपूतची शेवटची फिल्म म्हणून दिल बेचाराकडे पाहिलं गेलं. त्याने केलेली आत्महत्या, त्यानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेले वाद यामुळे एकूण आउटसायडर आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर अनेकजण व्यक्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर दिल बेचारा रिलीज झाला. डिस्ने हॉटस्टार यांनी हा सिनेमा रिलीज केला. २४ तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या. आयएमडीबी या विश्वासार्ह पोर्टलवर चाहत्यांच्या या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि या सिनेमाला शनिवारी सायंकाळपर्यंत रेटिंग मिळालं चक्क ९.८ सकाळी हे रेटिंग १० पैकी १० वर गेलं होतं
न्यूज अनकट प्रतिनिधी