“काजरो” चित्रपटाने महाराष्ट्राच्या फेट्यात मानाचा तुरा रोवला…..

पुणे २३ मार्च २०२१ : २०२० या वर्षातील राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पारितोषिक २२/३/२१ ला जाहीर झाले.ज्या अनेक चित्रपटांचा समावेश होता.तर दिग्दर्शक,कलाकार यांचे लक्ष या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराकडे लागला होता.आणि अखेर तो दिवस २२ तारखेला उजाडला.आणि या मध्ये मराठी चित्रपटांनी एक वेगळं स्थान निर्माण केले.

 

“काजरो” या कोकणी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ जाहीर झालं आहे.समाजातील विविध व्यवसथेमधल्या सामाजिक जाणीवेचं दर्शन या चित्रपटातून घडताना दिसले.अस्पृश्य जातीचा आसलेल्या तीळग्या मार्फत समाजात प्रचलित जात आणि वर्गभेद यावर वर्मी घाव घातला आहे.

दिग्दर्शक नितीन भास्कर यांच्या नजरेतला “काजरो”

दिग्दर्शक नितीन भास्कर म्हणतात “सामाजिक वर्ग प्रणालीने मला नेहमीच अस्वस्थ केले आहे.म्हणून जेव्हा मी काजरोची गोष्ट ऐकली तेव्हा मला समाजात जे वर्गीकरण आहे तेच मांडणे योग्य.स्क्रीनवर शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून दोन तासांत कोणाच्याही जीवनाच्या घडामोडी दाखवणे माझ्यासाठी खुप आव्हानात्मक होते.मी संवेदनशील घटना,मानवी संबंध,त्यांचे स्थान आणि वेळ संवेदनशील भावनांनी व्यक्त होण्यास सक्षम होतो.”असे ते म्हणाले.


२०१९ मध्ये मामी या फिल्म फेस्टिवल मुंबई,बेंगलोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२० , iffi goa २०१९ आणि औरंगाबाद चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली.तर औरंगाबाद चित्रपट या चित्रपटचे नायक विठठल काळे याला तीळग्याच्या पात्रासठी सर्वोत्कृष्ट आभिनेताचा पुरस्कार मिळाली.


या टिमच्या एकाग्रचित्त्यामुळे हे शक्य……


चित्रपट उभा राहताना प्रत्येक एक एक व्यक्ती तिथे आपलं १००% देत आसतो.आणि संघाच्या या एकाग्रचित्त्यामुळेच इथेपर्यंत मजल मारता आली म्हणने वावगं ठरणार नाही.हा चित्रपट,निर्मिता : राजेश पेडणेकर,कार्यकारी निर्माता : प्रवीण वानखेडे,दिग्दर्शक : नितिन भास्कर,लेखक: प्रकाश परियनकर,छायांकन : समीर भास्कर, संवाद : भुषण पाटिल,पोस्ट प्राॅड्कशन: स्मिता फडके,संगीत : रोहित नागभिडे,सांऊंड डिझायन : धनजंय साठे,प्राॅड्कशन डिझाईन: नितिन बोरकर या सर्व टिम मुळे “काजरो” चित्रपटाने कोकणी भाषेसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या फेट्यात मानाचा तुरा रोवला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा