गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित बहुप्रतिक्षित ट्रेलर या दिवशी रिलीज होणार

विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित बहुप्रतिक्षित ट्रेलर या दिवशी रिलीज होणार

मुंबई, ५ सप्टेंबर २०२२: अभिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान आणि हृतिक रोशन अभिनित बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट टीझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागवले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात सिनेमातील दोन्ही ऍक्टर्स आजवर कधीही न पाहिलेल्या रुपात दिसत आहेत, त्यामुळे ‘विक्रम वेधा’चे मेकर्स चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार ८ सप्टेंबर रोजी सिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहे.

गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमानाने विक्रम वेधाह्ण हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.

विक्रम वेधा’ या साऊथ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version