ट्विटर हॅण्डल इलॅान मस्क खरेदी करणार, या चर्चेला गेले दोन आठवडे उधाण आलं होतं. त्यानंतर त्यातील काही अकाउंट हे फेक असल्याचं जाणवल्यानंतर, त्या व्यवहाराला काही काळाकरिता रोखण्यात आले. त्यामुळे हा व्यवहार दोन आठवड्यांकरता थांबवण्यात आला होता. मात्र हे दोन आठवडे तीन जूनला संपले आणि हा व्यवहार तुटला, असे सांगण्यात आले.
इलॅान मस्क यांचा ट्विटरबरोबरच्सी व्यवहाराची रक्कम तब्बल ४४ बिलीयन डॅालर इतका होती. त्यातील २१ बिलीयन रक्कम त्यांनी देऊ केली होती. तर काही रक्कम ते टेस्ला कंपनीचे शेअर्समधून देणार असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यासाठी देण्यात आलेला काळ संपला असल्याने HSR कायद्यानुसार हा व्यवहार संपुष्टात आल्याचे सांगण्यात आलें. या कायदयानुसार दोन्ही भागीदारांना मोठी रक्कम भरावी लागणार असून ती रक्कम अजूनही जमा झाली नाही. ही रक्कम फेडरल ट्रेड कमिशन आणि अमेरीकेच्या जस्टीस ॲन्टीट्रस्ट विभागाकडे दाखवावी लागते. असा हा HSR कायदा १९७६ पासून अस्तित्वात आहे.
अहवालानुसार असे समोर आले आहे की, टेस्ला कंपनीच्या संचालकांनी या करारासाठी निधी मिळवला असून इक्विटी फॅडिंग द्वारे ३३.५ अब्ज आणि १३ अब्ज कर्जामार्फत देण्यात येणार होते. त्यामुळे ही रक्कम देण्याच्या कालावधीत उलटला असून आता या व्यवहारात पूर्णविराम लागला आहे. ट्विटर नंतर आता इलॅान मस्क कोकाकोला कंपनी खरेदी करणार असल्याचे त्यांनी ट्विट केले होते. आता नक्की कुठला व्यवहार आधी होणार , हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस