बारामतीत भटकी कुत्री पकडण्यासाठी नगर पालिका सरसावली

बारामती,५ जुलै २०२० : बारमती शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मारंडल्याने त्यांची जनमानसात दहशत पसरली आहे.नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रार करून पालिकेवर मोर्चे देखील काढले होते दोन दिवसांपूर्वी समर्थ नगर येथील लहान मुलींवर या भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्यावर नागरिकांनी जोरदार आंदोलन केल्यावर बारामती नगर पालिकेने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

बारामती शहरातील भटक्या कुत्र्यांचा रस्त्यावर सुळसुळाट झाला आहे.याबाबत अनेक वेळा मनसेचे भार्गव पाटसकर यांनी आंदोलन देखील केले आहे.कोरोना संसर्गामुळे मुळे हॉटेल,चिकनची दुकाने ,चायनिजचे गाडे बंद असल्याने या भटक्या कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने ही भटकी कुत्री आता रात्रीच्या वेळी किंवा सुनसान रस्त्यावर नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

शहरातील माळावरच्या मंदिराकडे,भिगवण रोड,आप्पासाहेब पवार मार्ग,सिनेमा रोड येथे पहाटे फिरायला आलेल्या वृद्ध नागरिकांना कुत्री चावली आहेत.त्यात कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने रेबिजची इंजेक्शन मिळत नासल्याचे काही लोकांनी सांगितले आहे .

दोन दिवसांपूर्वी समर्थ नगर येथे सात वर्षाच्या चिमुरडीवर या भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्यावर मात्र नागरिकांच्या संताप अनावर झाला आहे. यावर नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरल्यावर भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली आहे आत्ता पर्यंत शहरातून चाळीस भटकी कुत्री पकडली असल्याचे नेचर फ्रेंड्स ऑर्गनायझेशन चे बबलू कांबळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा