नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) करण जोहर यांना पाठविले समन्स

मुंबई, १८ डिसेंबर २०२०: नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) करण जोहर यांना समन्स पाठविले आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध करण जोहर यांना एनसीबी मुंबईने चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीचे म्हणणे आहे की, करण जोहर कोणत्याही प्रकरणात संशयी नाही. तर ड्रग्स संबंधित त्यांच्याकडे काही विचारपूस करावी लागणार आहे.

एनसीबीच्या सूत्रांनुसार करण जोहरला स्वत: एनसीबीसमोर हजर होण्याची गरज नाही. ते त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीस पाठवू शकतात. करण जोहरला जुलै २०१९ मध्ये त्यांच्या घरी आयोजित पार्टीच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची माहिती देण्यास सांगितले गेले होते.

बुधवारी करण जोहर यांना समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना २०१९ च्या पार्टी संबंधित सर्व नोंदी द्याव्या लागतील. जसे की, पार्टीत कोण कोण सहभागी होते. कोणत्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करण्यात अली होती. पार्टी साठी कोणते आमंत्रण पात्र पाठवले गेले होते का? शुक्रवार (१८ डिसेंबर) पर्यंत सर्व माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करण जोहरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ एनसीबीने खरा असल्याचा खुलासा केला आहे.

करण जोहरने हा व्हिडिओ शूट केल्याचे बोलले जात आहे आणि या व्हिडिओत मलायका अरोरा, रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, शकुन बत्रा, झोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पादुकोण आणि कार्तिक आर्यन सारखे कलाकार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा