पुणे,दि. २५ एप्रिल २०२० : पुण्यातून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय ६५ कुटुंबाचा जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी नवजवान भारत सभेकडून ‘सामूहिक स्वयंपाक घर’ सुरु करण्यात आले आहे. १७ एप्रिलपासून नवजवान भारत संघटनेकडून हा उपक्रम राबवला जात आहे. प्रवासी कामगारांसाठी हे स्वयंपाक घर सुरू करण्यात असून दररोज दोन वेळेचे जेवण दुपारी व रात्री नागरिकांच्या साह्याने बनवण्यात येत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पुण्यातील सुंदामाता मंदिरजवळील सर्वे नं ६२ कात्रज येथे राहणारे बांधकाम कामगार आपल्या कुटुंबियांसमवेत आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी अडवून तुमच्या अन्न पाण्याची सोय करू असे सांगितले होते. परंतु त्यांचा अन्न धान्याची सोय झाली नव्हती.त्यामुळे या परराज्यातील ६५ कुटुंबे पुण्यात अडकून पडली , या कुटुंबांना नवजवान भारत सभा या संघटनेने आधार देऊन त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटवला आहे.
सलग ८ दिवसापासून हे सामूहिक स्वयंपाक घर आहे. हे जेवण बनवताना गर्दी न करता, दक्षता घेत रोज स्वयंपाक बनवला जात आहे. व ह्यासाठी प्रवासी कामगार ही मदत करत आहेत. असे नवजवान भारत सभेचे कार्यकर्ते कपिल पवार ह्यांनी ‘न्यूज अनकट’ शी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे