जेजुरीच्या खंडोबाचा नवरात्रोत्सव होणार साधेपणाने पूजा नित्योपचार वगळता इतर कार्यक्रम रद्द

पुरंदर, दि.१५ ऑक्टोबर २०२०: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरात यंदाचा दसरा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार आहे.तर दसऱ्याच्या वेळी होणारे इतर कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आल्याने यावेळचा मर्दानी दसरा उत्सव होणार नसल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विस्वस्त संदीप जगताप याणाई दिली आहे.

मर्दानी दसरा जरी रद्द केला असला तरी परंपरेप्रमाणे होणारी पूजा अर्चा व नित्योपचार मान्यवरांच्या उपस्थित पर पडणार आहेत. मात्र श्रींचा पालखी सोहळा , खंड ( मर्दानी दसरा ) स्पर्धा , राज्यातून येणारे कलावंत व वाघ्या मुरळी यांची हजेरी , दसरानिमित्त होणारे मानपान / रोख मानधन , भजन , पूजन , प्रसाद वाटप आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा- सात महिन्यांपासून मंदिर बंद आहे.

तर नवरात्र उत्सवातही ते बंद राहणार आहे, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मंदिरातील पुजारी , नित्य वारकरी , सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा व नवरात्र उत्सवातील पूजाअर्चा होणार असल्याची माहिती देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा