अखेर एनसीबीने रियाला केली अटक

मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: रिया चक्रवर्ती यांना सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबीने रियाला अटक केली आहे. आता त्यांच्या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीने ट्विट केले की देव आमच्याबरोबर आहे. रिया चक्रवर्ती यांच्या अटकेबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, ड्रग पेडलरसोबत तिचे संबंध होते. म्हणून तिला अटक केली आहे. नारकोटिक्स कंट्रोल बोर्डाला (एनसीबी) रिया चक्रवर्तीविरूद्ध महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत.
दुसरीकडे, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती चा तपास देखील आता आणखीन खडक करण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणात शोव्हिक आधीपासूनच एनसीबीच्या ताब्यात आहे. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरोधात तक्रार दाखल केली.

सुशांतच्या वडिलांनी थेरपिस्टविरूद्ध केली तक्रार

सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकर विरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. सुजैन वॉकर सुशांतची थेरपिस्ट होती. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी निवेदन दिले आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा