गोल पोस्ट आरोग्य कोरोनाच्या नवीन वेरिएंटला दिले ‘ओमिक्रॉन’ असे नाव; आफ्रिकेतील फ्लाइट्सवरही बंदी

कोरोनाच्या नवीन वेरिएंटला दिले ‘ओमिक्रॉन’ असे नाव; आफ्रिकेतील फ्लाइट्सवरही बंदी

पुणे, 27 नोव्हेंबर 2021: जागतिक आरोग्य संघटनेने B.1.1529 या कोरोनाचे नवीन वेरिएंट ‘वेरिएंट ऑफ कंसर्न’ म्हणून घोषित केले आहे.  इतकेच नाही तर WHO ने आफ्रिकेतील बोत्सवाना येथे प्रथम आढळलेल्या या वेरिएंटला ओमिक्रॉन असे नाव दिले आहे.
 WHO ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनावरील तांत्रिक सल्लागार गटाची बैठक झाली.  यामध्ये कोरोनाच्या नवीन वेरिएंट B.1.1.529 वर चर्चा करण्यात आली.  यादरम्यान, गटाने व्हेरिएंटला ‘वेरिएंट ऑफ कंसर्न’ म्हणून घोषित करण्याचा सल्ला दिला.  कोरोनाच्या इतर प्रकारांप्रमाणेच WHO ने त्याचे नाव ‘ओमिक्रॉन’ ठेवले आहे.
आफ्रिकेत प्रथमच सापडले वेरिएंट
 24 नोव्हेंबर रोजी प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कोरोना B.1.1529 चे नवीन वेरिएंट आढळून आले.  डब्ल्यूएचओने सांगितले की दक्षिण आफ्रिकेत बी.१.१.१.५२९ वेरिएंट उघडकीस आल्यानंतर संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे.
 नवीन वेरिएंटवर WHO काय म्हणाले?
  डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, या वेरिएंट मध्ये अनेक म्यूटेशन आहेत, त्यापैकी अनेक चिंतेचे आहेत.
सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की या वेरिएंटमुळे संसर्ग पुन्हा वाढू शकतो.
दक्षिण आफ्रिकेतील जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये या वेरिएंटची प्रकरणे वाढत आहेत.
तथापि, सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना (SARS-CoV-2) चाचणीच्या पद्धतीद्वारे हा वेरिएंट शोधला जाऊ शकतो.
अमेरिका आणि युरोपीय देशांनी आफ्रिकेतील विमानांना घातली बंदी
कोरोनाच्या नवीन वेरिएंटबाबत येत असलेल्या बातम्यांदरम्यान, अमेरिका आणि युरोपीय देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.  एवढेच नाही तर आफ्रिका आणि आसपासच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे.  दुसरीकडे, बायडेन प्रशासनानेही सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेला उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  कॅनडानेही गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.  जोपर्यंत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version