ज्ञानवापी प्रकरणी पुढील सुनावणी ११ ऑक्टोबरला

वाराणसी, ७ ऑक्टोबर २०२२: ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणात वाजू खानामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख ११ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोर्टात दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते. हिंदू पक्षाच्या वतीने चार फिर्यादी आणि त्यांचे वकील विष्णू शंकर जैन आणि हरिशंकर जैन न्यायालयात पोहोचले होते. कोर्टाच्या आदेशानुसार, हिंदू पक्षाचे वकील विष्णुशंकर जैन यांनी या प्रकरणात कार्बन डेटिंगऐवजी इतर कोणत्याही वैज्ञानिक तंत्राने गोष्टी स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

वैज्ञानिक तपासणीद्वारे याचिकाकर्त्यांना हे कथित शिवलिंग किती उंच, किती रुंद आणि किती खोल आहे हे शोधायचे आहे. ते म्हणतात की, या तपासणीनंतर हे कारंजे आहे की शिवलिंग आहे हे स्पष्ट होईल.

दरम्यान, या वर्षी मे महिन्यात ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यानंतर हिंदू पक्षाने दावा केला होता की, मशिदीच्या वाजूखानाच्या मध्यभागी एक ‘शिवलिंग’ सापडले आहे. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने ते सील करण्याचे आदेश दिले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा