गोल पोस्ट इतर राजकारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला

मुंबई, १० जानेवारी २०२३ : सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे.

खरी शिवसेना नक्की कोणाची ? यावर राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत अजून कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

१६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका ठाकरे गटाकडून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव शिंदे गटाकडून यासह आणखी चार याचिकांवर सर्वांत आधी २१ जुलै रोजी सुनावणी झाली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या बाजूने आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला.

त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने परिस्थिती जैसे थे ठेवत ही सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली होती. दरम्यान, आज न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचे मत घेऊन ही सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version