अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात खळबळ, निफ्टी 550 हून अधिक अंकांनी तर सेन्सेक्स 1900 अंकांनी घसरला

Share Market crash, 25 जानेवारी 2022: अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात खळबळ उडाली. दिवसाच्या व्यवहारात, निफ्टी 550 हून अधिक अंकांनी घसरला, तर सेन्सेक्स 1900 हून अधिक अंकांनी घसरला. बाजारात सर्वत्र विक्रीचे वातावरण आहे.

काल बाजार उघडताच सेन्सेक्स 250 अंकांपेक्षा अधिक घसरला. यानंतर जसजसे सत्र पुढं सरकत गेलं तसतसा बाजार घसरत राहिला. दिवसभर बाजाराला श्वास घेण्याची संधी मिळाली नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स 1000 अंकांपेक्षा अधिक घसरला होता. यामुळं विक्रीचा जोर वाढला. दुपारी 02:15 पर्यंत सेन्सेक्स 1983.07 अंकांनी घसरला होता आणि तो 57 हजार अंकांच्या खाली जाण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणं, NSE निफ्टी जवळपास 600 अंकांनी घसरून 17,020 वर आला होता.

पुढील आठवड्यात येत आहे बजेट

सलग 5 दिवस शेअर बाजारात घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी किरकोळ वाढ झाल्यानंतर, शेअर बाजारात दररोज घसरण झाली. यादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी 3.50 टक्क्यांपर्यंत खाली आले. ही घसरण अशा वेळी होत आहे जेव्हा नवीन अर्थसंकल्प अवघ्या एक आठवड्यावर आहे. पुढील आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

रिअल्टी सेक्टरची सर्वात वाईट स्थिती

बाजारात विक्रीची अशी स्थिती आहे की, सेन्सेक्सच्या सर्व 30 कंपन्या तोट्यात आहेत. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, विप्रो, टायटन आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या कंपन्या 4.5 टक्क्यांवरून 6.15 टक्क्यांवर घसरल्या आहेत. क्षेत्रनिहाय पाहता कोणताही गट नफ्यात नाही. अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करणारे रिअॅल्टी क्षेत्र आज 6 टक्क्यांहून अधिक घसरलं आहे.

याची भीती बाजाराला सतावत आहे

यूएस मध्ये, फेडरल रिझर्व्ह अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदर वाढवण्याची अपेक्षा आहे. या आठवड्यात मंगळवारपासून फेडरल रिझर्व्हची महत्त्वाची बैठक सुरू होत आहे. बुधवारी, यूएस सेंट्रल बँक बैठकीची माहिती देईल, ज्यामध्ये दर वाढीबाबतचे संकेत स्पष्ट होऊ शकतात. बाजाराला त्याच गोष्टीची चिंता आहे. या भीतीनं एफपीआय बाजारातून वेगानं पैसे काढत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा