गोल पोस्ट आरोग्य राज्यातील कोरोनाचा आकडा

राज्यातील कोरोनाचा आकडा

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२० : राज्यात काल कोविड १९ चे ६,६०८ रुग्ण बरे झाले तर ५०११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आता पर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता १७ लाख ५७ हजार ५२० झाली असून यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६ लाख ३० हजार १११ आहे.

सध्या राज्यात ८०,२२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आता ९२.७५ शतांश टक्क्यांवर पोहोचलं असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण ४.६३ शतांश टक्के आहे.

काल राज्यात कोविड १९ च्या १०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या ४६,२०२ वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. गेले कित्येक दिवस त्यात घट झालेली नाही. राज्यात आतापर्यंत केलेल्या कोरोना चाण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण १७.७५ शतांश टक्के आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version