गोल पोस्ट आरोग्य उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या सहा ने वाढली

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या सहा ने वाढली

उस्मानाबाद, दिनांक २० मे २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मंगळवारी(दि.१९) रोजी रात्री आलेल्या अहवालामध्ये ६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

यातील २ रूग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. संबंधित ६ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ४६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद शहरामधील एक तरूण, परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे २ रूग्ण, भूम तालुक्यातील गिरवलीचा १ रूग्ण, लोहरा तालुक्यातील जेवळीचा एक रूग्ण हे सर्व मुंबई वरून आलेले आहेत, तसेच तुळजापूरच्या एका महिलेचा ही अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही महिला पुण्याहून आलेली आहे. संबंधित सर्व व्यक्तींना उस्मानाबाद जिल्ह्यात परतल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version