सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झालीे

आज सोलापूरात आणखी दोन रुग्ण आढळून आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले .
ते म्हणाले, सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या ४१ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका महिलेला सारी चा त्रास होऊ लागल्याने २० एप्रिल ला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं .तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. आज मृत्यू पावलेल्यांमध्ये दोन पुरूष होते, यामुळे मृतांची संख्या ४ झाली आहे. आतापर्यंत सोलापुरात कोरोना चाचणीसाठी ९०७ जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील ८६६ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे .तर ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोलापूर शहरात आज सकाळी संचारबंदीत अत्यावश्यक अन्नधान्य भाजीपाला खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर आले होते, यामुळे सामाजिक अंतरचा ( सोशल डिस्टंसिंगचा) बोजवारा उडाला अखेर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून लोकांना तसेच विक्रेत्यांना हुसकावून लावलं काही जणांची वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा