देशात कोरोना रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या पार

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: देशातील कोरोना प्रकरणं अनियंत्रित वेगानं वाढत आहेत. या धोकादायक साथीच्या आजारात आतापर्यंत ५० लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर ८२ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संक्रमण होण्याचं प्रमाण वाढून ५०,०८,८७८ झालं आहे. गेल्या २४ तासांत ८१,९६४ नवीन प्रकरणं नोंदली गेली. त्याच वेळी, कोरोनामुळं आतापर्यंत ८२,०३८ लोक मरण पावले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९,९३,०७५ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत, तर ३९,३१,३५६ लोक आतापर्यंत या आजारातून बरे झाले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी (२०,४३२) नोंद झाली.

राज्यांविषयी चर्चा केली तर महाराष्ट्रा नंतर आंध्र प्रदेश ८८४६ नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर कर्नाटक (७५७६), उत्तर प्रदेश (६८४१), तमिलनाडु (५६९७) आणि दिल्ली (४२६३) नवीन प्रकरणं नोंदवली गेलीय.

कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये एक चांगली बातमी अशी आहे की आतापर्यंत देशातील ३९ लाखांहून अधिक लोक उपचारानं बरे झाले आहेत. आतापर्यंत सुमारे ६ कोटी कोरोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात ७६ लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

महाराष्ट्रात सर्वाधिक ॲक्टिव्ह प्रकरणं

देशातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ५ हजार ते ५० हजार दरम्यान आहे. अशी केवळ ४ राज्ये आहेत जिथं सक्रिय प्रकरणांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. सर्वाधिक सक्रिय प्रकरणं महाराष्ट्रात आहेत जी २,९१,७४७ एवढी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा