मुंबई: देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या ८३० च्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत या विषाणूमुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, लॉकडाऊनचा आज चौथा दिवस आहे. तर राज्यातील करोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १५९ वर गेली आहे.
राज्यात आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान, पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या ८५ वर्षीय करोनाबाधित डॉक्टरचांही मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका दीड वर्षाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, राज्यात एकाच दिवसांत २८ करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५९ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील गुरुवारी बाधित आलेल्या रुग्णांच्या ५ सहवासितांचा समावेश आहे.
या संकट बरोबर कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे हजारो प्रवासी कामगार आपल्या कुटुंबासमवेत शेकडो किलोमीटर चालत आहेत. यामध्ये वृद्ध, मुले, महिला आणि अपंग देखील आहेत. त्यांच्याकडे राहण्याची सोय नाही, पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न नाही. तर दुसरीकडे सकारात्मक बातमी देखील येत आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांच्या डिस्चार्जची देखील संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. ४ हजारांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या आहे. त्यातच १९ रुग्णांना डिस्चार्ज केले आहे.
दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.