राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४५ वर

पुणे: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचं थैमान थांबण्याच नाव घेताना दिसत नाही. बुधवारी नव्याने समोर आलेल्या चार रुग्णानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४५ वर जाऊन पोहचला आहे. मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.

रत्नागिरीतील परदेशातून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यापूर्वी मागील काही तासांत पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती. पिंपरी चिंचवडमधील २१ वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. रत्नागिरीतील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. तर अमेरिकेहून आलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी सरकार आणि  स्थानिक प्रशासनाकडून अनेक कठोर पावले उचलण्यात येत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या बंदीनंतर राज्यातील विविध भागात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
·    पिंपरी चिंचवड – ११
·    पुणे – ८
·    मुंबई – ८
·    नागपूर – ४
·    यवतमाळ –३
·    कल्याण – ३
·    नवी मुंबई – ३
·    रायगड – १
·    ठाणे -१
·    अहमदनगर – १
·    औरंगाबाद – १
·    रत्नागिरी-१
·    एकूण ४५

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा