देशात कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा एक लाखाच्या पार

नवी दिल्ली, ३ ऑक्टोंबर २०२०: भारतात कोरोनामधील मृतांची संख्या १ लाखांच्या पुढं गेलीय. कोरोना मध्ये आतापर्यंत १ लाख ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी कोरोनाची ६४ लाख ३८ हजाराहून अधिक प्रकरणं आढळली आहेत. यापैकी ९ लाख ४० हजाराहून अधिक प्रकरणं ही ॲक्टिव्ह रुग्णांची आहेत. यासह देशात रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील सातत्यानं वाढत आहे.ही एक दिलासादायक बाब आहे. ही संख्या आता वाढून ५३ लाख ९३ हजारांवर गेलीय.

कोरोनामुळं जगात सर्वाधिक प्रभावित असलेला देश अमेरिका आहे. अमेरिकेनंतर भारताचा नंबर लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील सर्वात सामर्थ्यवान मनाला जाणार देश अमेरिकेनं देखील कोरोना समोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत एकूण ७२ लाख ९२ हजार ४२२ प्रकरणं आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्या २ लाख ८ हजार ६८ आहे. ब्राझील तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे कोरोनाची एकूण ४८ लाख ४७ हजार ९२ प्रकरणं आहेत आणि १ लाख ४४ हजार ६८० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या १० लाख २५ हजारांवर गेली आहे. आतापर्यंत जगात कोरोनाचे एकूण ३,४४,११,७०८ रुग्ण आढळले आहेत. यानुसार जगात कोरोनाचा मृत्यू दर जवळपास ३ टक्के आहे.

भारतातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्र

भारतात कोरोनाचं सर्वाधिक प्रमाण राज्यात आहे. राज्यात कोरोनाचे १४ लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ लाख ५९ हजाराहून अधिक प्रकरणं ऍक्टिव्ह आहेत. ११ लाखांहून अधिक बरे झाले आहेत. मृतांचा आकडा ३७ हजारांच्या पुढं गेलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा