मुंबई, १ जून २०२१: कोरोना च्या दुसऱ्या लाटेनं राज्यात कहर माजवला होता. यावेळी करणामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूचे आकडे समोर आले तर त्याहीपेक्षा जास्त संख्येने रोज नवीन रुग्णांचा आकडा वाढत चालला होता. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळं दुसऱ्या लाटेला कुठेतरी आळा बसताना दिसत आहे. नुकताच राज्य सरकारनं १५ जून पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय देखील घेतला. आता राज्यातील संक्रमण दर देखील हळूहळू कमी होत चालला आहे. त्यात आणखीन एक दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात राज्यात केवळ १५,०७७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात काल १५,०७७ नवीन रुग्णांचं निदान झालं असून, राज्यात काल दिवसभरात १८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं मृत्यूदर हा १.६६ टक्के एवढा झालाय. राज्यात काल १५,०७७ नवीन रुग्ण सापडल्यानंतर काल रोजी एकूण २,५३,३६७ सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,४६,८९२ झालीय.
राज्यात काल ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेलेत
राज्यात आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण ५३,९५,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८ % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे