कन्नड, छत्रपती संभाजीनगर २१ ऑक्टोबर २०२३ : आज महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसाच्या समस्यावर थेट हात घालून काम करणारा ‘वंचित बहुजन आघाडी’ हा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन, वंचित बहुजन आघाडी चे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी कन्नड तालुका संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले. कन्नड शहरातील खांडसरी रोड, ग्रामीण पोलिस स्टेशन जवळ कन्नड तालुका वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर याचां हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतानां ते म्हणाले की, संपर्क कार्यालयातून सर्वसामान्याचे प्रश्न सोडविले गेले पाहिजे. लोकांना जोडण्यासाठी संपर्क कार्यालयाचा उपयोग व्हावा. गायरान धारकांच्या प्रश्नावर, विद्युत मंडळाच्या वाढीव बिल प्रश्नावर तसेच कंत्राटी भरती आणि जनतेच्या इतर प्रश्नांवर ‘वंचित बहुजन आघाडी’ नेहमीच लढा देत आली आहे. प्रास्ताविक करताना वंचित बहुजन आघाडीचे (पु) कन्नड तालुका अध्यक्ष अनिल सिरसाठ यांनी कन्नड तालुका हा क्रांतिकारी तालुका असून मक्रणपुर ठिकाण बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालय माध्यमातून, पक्ष वाढीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यक्रते प्रयत्न करतील.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरूधंतीताई सिरसाठ, राज्य सदस्य अमितभाऊ भुईंगळ, पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश बन, पूर्व जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बकले, महिला जिल्हा अध्यक्ष लता बमणे, युवा जिल्हा अध्यक्ष सतिश गायकवाड, पंकज बनसोड, रुपचंद गाडेकर, गणेश कोतकर, पी.के.दाभाडे आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र सुंचालन विनोद कदम यांनी तर आभार गणेश मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी आयोजक तथा पु. तालुका अध्यक्ष अनिल सिरसाट, विनोद कदम, गणेश मोरे, सुभाष सिरसाठ, अक्षय महाले, अमोल साळवे, सतिश धनेधर, भिमराव खिल्लारे, कचरू मेंगाळ, मुकेश थोरात, अविनाश राठोड, विकास राठोड, प्रवीण धिवर, असिफ शेख, राहुल जाधव, विशाल पवार, मुकेश गायकवाड, संदीप अंभोरे, अविनाश पगारे, सुनिल बोर्डे, तातेराव भुजंग, ईश्वर ‘गायकवाड, महिला आघाडी च्या विद्याताई दिवेकर, पुजा लोखंडे, विकास राठोड, संकेत म्हस्के, सागर मोरे, सुनिल सिरसाठ, दिपक बावस्कर, सुनिल गायकवाड, देवीदास भालेराव, दिलाप भालेराव, अजय सिरसाट, भास्कर देवरे, आकाश बोर्डे, अरविंद कांबळे, रमेश धनेधर, गौतम जाधव आदींनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्या ने महिला पुरुष उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंदकुमार लांडगे