पुणे, 25 सप्टेंबर 2021: चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo 27 सप्टेंबरला भारतात Oppo F19s लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने लाँचिंगची तारीख आधीच निश्चित केली आहे. Oppo ने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर एक मायक्रो साइटही बनवली आहे. या स्मार्टफोनबद्दल काही वेगळ्या प्रकारची माहिती येथे आहे.
Oppo F19s हा Oppo F19 सारखाच दिसतो. वेबसाइटनुसार, या स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिस्प्ले असंल आणि मागील कॅमेरा मॉड्यूल देखील Oppo F19 सारखाच असंल. Oppo F19s मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले जाऊ शकते. कंपनी ब्लॅक आणि गोल्ड कलर व्हेरिएंटसह भारतात लाँच करू शकते.
Oppo F19s मध्ये दिलेल्या संभाव्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं तर तो 6.43 इंच आहे आणि याला फुल HD प्लस AMOLED पॅनल देण्यात आलं आहे. Oppo F19s मध्ये Qualcomm Snapdragon 662 ऑक्टा प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज दिलं जाऊ शकते.
Oppo F19s मध्ये, Android 11 आधारित कंपनी आपली कस्टम OS देईल. अलीकडंच कंपनीने Oppo Reno मालिकेचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. Oppo ने Oppo F19 मालिकेअंतर्गत भारतात काही स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी एक Oppo F19 Pro Plus आहे, ज्याची किंमत बाजारात 25,990 रुपये आहे.
कंपनी Oppo F19s ची किंमत 20 ते 25 हजारांच्या दरम्यान ठेवू शकते. या सेगमेंटमध्ये भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळं कंपनी हा फोन अधिक महाग लाँच करणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे