रैना वर भडकले चेन्नई सुपर किंग्जचे मालक…

5

यूएई, ३१ ऑगस्ट २०२०: सुरेश रैनाच्या आयपीएल सोडून जाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे मालक नाराज झाले आहेत. याबाबत ते म्हणाले की, रैनाच्या अशा अचानक जाण्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. परंतु, धोनीने आता सर्व सांभाळून घेतले आहे. पुढे ते म्हणाले की, “मला असं वाटत आहे की रैना परत येईल. त्याची देखील अशीच इच्छा असेल. अजूनही आयपीएल हंगाम सुरू झालेला नाही. रैना परत गेला असला तरी त्याला हे नक्कीच जाणवलं असेल की त्यानं काय गमावले आहे (११ कोटी रुपये). जर तो पुन्हा आला नाही तर त्याला यापासून मुकावं लागणार आहे.

याबाबत श्रीनिवास यांनी सांगितले की, “माझे धोनी सोबत बोलणं झाले आहे. धोनी म्हणाला आहे की याबाबत तुम्ही चिंता करू नका. जर आणखी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर चिंता करण्याची गरज नाही. धोनीने सर्व खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला आहे व त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत देखील सांगितले आहे.”

आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवासन म्हणाले की, “दुबईला आल्यापासून रैना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टींबाबत तक्रार करत आहे. रैनाच्याच्या डोक्यात सफलतेचं भूत शिरलं आहे. जर रैना परत जात असेल तर त्याला मी रोखू इच्छित नाही आणि मी कोणावर दबावही टाकू इच्छित नाही. कधीकधी अधिक यश व प्रसिध्दी माणसाला वेगळ्याच धुंदीत घेऊन जाते.”

श्रीनिवासन म्हणाले, ‘सीएसके एक कुटुंबासारखे आहे आणि सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी त्यात राहायला शिकले आहे. जर आपण एखाद्या गोष्टीवर अडखळत असाल किंवा एखाद्या गोष्टीवर नाराज असाल तर परत जा. ‘ दुबईत आल्यापासून रैना हॉटेलच्या खोलीत खूष नव्हता अशा बातम्याही आल्या आहेत आणि त्याला कोरोनासंबंधी कठोर प्रोटोकॉल हवा होता. त्याला धोनीसारखे एक कक्ष हवे होते कारण त्याच्या खोलीची बाल्कनी योग्य नव्हती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा