पुणे, ६ डिसेंबर २०२०: तळेगाव चाकण रोड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. चाकण पासून ते थेट मुंबईला जोडणारा हा महामार्ग असून इथून प्रवास करताना अनेक प्रवाशांना त्रास होतोय. रस्त्यावरील खड्डे आलिकडेच बुजवण्यात आले होते. मात्र, तरीही आता खड्डे परत होताना दिसत आहेत.
या राज्य महामार्गावर औद्योगिक महाराष्ट्र विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी चा प्रवर्ग आसून ही अशी अवस्था आहे. तर शिवाजी चौक (चाकण)५०० मीटर चे अंतर कापण्यासाठी वाहनांना अर्धा ते पाऊण तासाचा वेळ घालवावा लागतो.
पावसाळा आला की प्रशासनाला रस्त्याची दुर्दशा दिसते आणि रस्त्यांच्या कामांना वेग येतो.मात्र या महामार्गावर काम करून ही तीच परिस्थिती उद्भवत असल्याने प्रवासी नाराज आहेत. तर राज्य महामार्ग म्हणून आसलेल्या या रस्त्यावर सरकारची नजर केव्हा जाईल? आणि नागरिकांना तसेच प्रवशांना खड्डे व लांबच्या रांगापासून कधी सुटका होईल? हे सरकारलाच माहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव