लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित ; तरी जिल्हा सोडून लग्नाला

पुरंदर, दि.१९ मे २०२०: लग्न घरातील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येऊनही मायणी (जि.) येथून आज (मंगळवारी) वऱ्हाडी मंडळी सगळ्यांचे जीव धोक्यात घालून गुळुंचे (ता.पुरंदर) येथे विवाहासाठी आली. मात्र, संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाने पुणे जिल्हा प्रशासनाला ही माहिती तातडीने कळविली.

मात्र, दोन्ही बाजूंच्या लोकांनी विवाहाला परवानगी असल्याचे सांगत सकाळी साडे दहालाच विवाह आटोपला. या बातमीने संबंध जिल्ह्यात तसेच तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती वऱ्हाडी मंडळींच्या संपर्कात आली असल्याने आता दोन्ही पक्षांकडे कोरोना संशयित रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी सहा वाजता खटाव मायणी हुन वऱ्हाडाने पाडेगाव टोलनाका साडेसात वाजता ओलांडला. याच लोकांच्या घरातील एक व्यक्ती आजारी असल्याने त्याची कोरोना टेस्ट केली होती. आज सकाळी त्याचा रिपोर्ट येणार होता. त्यापुर्वीच वऱ्हाडी मंडळी नीरेत पोहचली. रिपोर्ट पाॅजिटीव्ह आल्यावर प्रशासनाने संबंधितांना संपर्क सधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. तेथिल प्रशासनाने चौकशी केली असता रूग्णाच्या कुटुंबातील विवाह असल्याचे समजले. त्यानंतर खंडाळा व पुरंदर प्रशासनाशी संपर्क करून माहिती देण्यात आली. त्यामुळे सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासन सजग झाले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना पुरंदरच्या प्रशासनाने नवरदेव सोडून माघारी जाण्याची विनंती केली. आणि सोशल डिस्टंसींग पाळत साडेबाराच्या मुहूर्ताच लग्न साडेदहा वाजताच लागलं.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर विवाह सोहळ्याला पन्नास माणसात लग्न लावण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. मात्र आज नीरा नजिकच्या एका मोठ्या व प्रतीष्ठीत गावात एक प्रतीष्ठीत कुटुंबातील विवाह सोहळा होता. वास्तविक हा विवाह सोहळा ३० मे रोजी होणार होता. पण तो आज १९ रोजी घेण्यात आला. मायणी येथिल देशमुख परिवारातील वर व पुरंदर तालुक्यातील निगडे-देशमुख परिवारातील वधु यांचा विवाह थोडक्या लोकांत छोटखानी कार्यक्रम नियोजित होता. मायणी येथुन वऱ्हाड पहाटे सहा वाजता निघाले. सात वाजता वराच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. ती व्यक्ती वऱ्हाडात नव्हती पण ते मागील काही दिवसांपासून या त्यांच्या संपर्कात होते.

तो बडा अधिकारी कोण?
प्रशासनाला माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱी याठिकाणी पोहोचले . प्रत्येकाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. अगदी नववधी आणि नवरदेव सुद्धा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुचनेनुसार होम क्वारंटाइनचे शिक्के हातावर मारणार तोच एका बड्या अधिकाऱ्याचा फोन प्रशासनाला आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथुन काढता पाय घेतला आहे. या सर्व घटनांची खरमरीत चर्चा परिसरात केली जात आहे.

रिपोर्ट सकाळी सहा वाजता आला आणि शासनाचे लोक घरी जाईपर्यंत हे वऱ्हाड निघाले होते. पुरंदर प्रशासनाने तातडीने जाऊन समजूत काढत लग्न सोहळा उरकुन घेतला आहे. संबंधित संपर्कातील लोकांना होम क्वारंटाइन किंवा प्राथमिक शाळेत ठेवण्यात येईल. आरोग्य विभागाशी बोलणे करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
– रुपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा