नवी दिल्ली, २२ ऑगस्ट २०२०: इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला शुक्रवारी रात्री दिल्लीमधून अटक झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर आहेत. अबू युसूफ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो उत्तर प्रदेश बलरामपूरचा आहे. आता यासंदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान या दहशतवाद्याने एक मोठा खुलासा केला आहे.
दिल्लीत पकडलेला आयएसआयएसचा संशयित दहशतवादी अबू युसुफ याने प्राथमिक चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात स्फोटांचे कट रचले गेले होते. दहशतवादी अबू युसूफला राम मंदिर निर्माण संबंधित बॉमबस्फोट करायचा होता. ही फक्त सुरुवातीची माहिती आहे. त्याचा अफगाणिस्तानातल्या काही म्होरक्यांशी संपर्क होता.
सध्या एनएसजीची टीम प्रेशर कुकरमध्ये कोणते स्फोटके अस्तित्त्वात होती आणि त्यात कोणते रसायन वापरले गेले याचा तपास करीत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वी दोन महत्त्वाचे इशारे जारी केली होती, त्यातील एक म्हणजे राम मंदिर बांधण्याच्या संदर्भात दहशतवादी मोठी दहशतवादी घटना घडवू शकतात हा इशारा होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी