विमान हवेत होतं, प्रवाश्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला, अन् मग तेलंगाणाच्या राज्यपाल पुढे सरसावल्या, जीव वाचला, वाचा संपूर्ण घटना

हैदराबाद: २४ जूलै२०२२: कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही. विमान प्रवासादरम्यान एका प्रवाश्यासोबत एक घटना घडली. त्याला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला.

विमान हवेत होतं, त्यामुळे या एका प्रवाशाला रुग्णाल्यात नेणं शक्य नव्हतं, त्यामुळे या विमानात कुणी असं आहे का जे रुग्णावर उपचार करु शकतील? अशी अनाउंसमेंट झाली. या विमानात तेलंगानाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन प्रवास करत होत्या. त्यांनी तात्काळ आपल्या जागेवरुन उठत त्या रुग्णाजवळ गेल्या. अन् त्यांनी या रुग्णावर उपचार केले. अन् या प्रवाश्याचा जीव वाचला.

राजकारणात येण्याआधी त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं आहे. १९९४ च्या बॅचचे आयपीएस आणि डीजीपी रॅकचे अधिकारी कृपानंद त्रिपाठी उजेला हे देखील प्रवास करत होते.

त्यांना अचानकपणे त्रास जाणवू लागला. अन् तमिलिसाई सुंदरराजन यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला. उपचार सूरु असतांना त्यांनी मला पुढे वाकायला सांगितले. आणि काहीवेळ तसंच बसून रायला सांगितले. त्यांनी मला नवीन जीवनदान दिलंय.

त्यांचे हे उपकार कधीही विसरु शकत नाही. असं त्रिपाठी उजेला म्हणाले. सुंदरराजन याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हैदराबादमध्ये उतरल्यानंतर त्यानां दवाखान्यात नेण्यात आलं.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा