तुम्हाला खदखदून हसवण्यासाठी येत आहे नाटक ‘अयोध्या vs लंका’

पुणे, ३० डिसेंबर २०२०: कोरोना महामारीमुळे संपूर्ण कला क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास गेल्या दहा महिन्यांपासून कलाक्षेत्र लाॅकडाऊनच्या काळात बंद होते. मात्र, सरकारच्या नियमानुसार हळूहळू रंगभूमीवर पुन्हा एकदा कलाकार नव्या जोशाने आणि उमेदीने नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी त्याच जोशाने उतरले आहेत.

कोरोनामुळे रंगभूमीच्या अनेक कलावंतानी वेगवेगळ्या पर्यायतून प्रेक्षकांना या परिस्थितीत देखील मनोरंजन आणि कोरोना स्थितीशी लढण्याची प्रेरणा दिली आणि आता तर थेट थिएटरमध्येच नाटकांच्या परवाने रसिकांना अनुभवता येणार आहेत. अशीच एक नाटकाच्या मनोरंजनाची मेजवानी म्हणजे लक्ष्मीकांत विसपुते लिखित आणि दिग्दर्शित अयोध्या vs लंका हे नाटक.

पांडव प्रस्तुत, ओम आर्ट्स, स्वर फिल्मस् निर्मित अयोध्या vs लंका हे नाटक कोरोना नंतर पुन्हा रंगभूमीवर आले आसून “कोरोनाशी युद्ध जिंकले आपण, आता हास्ययुद्ध बघा…” असे फुल टू धमाल काॅमेडी आसलेलं नाटक रसिकांना भुरळ घालण्यासाठी आले आहे. या नाटकाला जाणारा प्रत्येक रसिक हा आपलं सर्व ताणतणाव विसरून निखळ हास्य मनोरंजनाचा आस्वाद घेतो अशी हि कलाकृती.

अयोध्या vs लंका या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्मीकांत विसपुते यांनी केली आसून, डाॅ संतोष पोटे आणि संतोष चव्हाण यांनी निर्मिती केली आहे. तसेच नाट्यरसिकांना हासवण्यासाठी या नाटकात कसलेले कलाकार नाटकाला चांगलाच न्याय देताना दिसतात. या नाटकाचे प्रयोग बालगंधर्व, मोरे थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.

या नाटकात कलाकार म्हणून गौरी कुलकर्णी यांच्या आभिनयाला प्रेक्षक चांगली दाद देताना दिसले तर तसेच, संतोष चव्हाण, रितेश नागराळे, मंगेश दळवी, सतीश पवार, चेताली जाधव आणि लक्ष्मीकांत विसपुते प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवतात. त्यामुळे कोरोना नंतर डोक्यावरचा ताण आणि टेंशन ला विसरून जाण्यासाठी एकदा नक्कीच अयोध्या vs लंका या नाटकाचा आस्वाद घ्यायला हवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा