लोणी काळभोर, दि. २३ जून २०२० : येथे दि. २३ जून २०२० रोजी काळाच्या ओघात सर्व काही बदलून जाते तशी ही फार जुनी समस्या आहे, इतिहास असे सांगतो की काही घटना जग बदलून टाकतात किंवा जगाला नाईलाजाने बदलावे लागते अशा घटना मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकतात अशा घटनांनंतर जीवन बदलून जाते त्यातून काही नव्या गोष्टींचा उदय होतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटानंतरही असेच काही बदलून जाणार आहे.
लोणी काळभोरच्या राजबाग मधील एमआयटी आर्टस, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे आज मंगळवार दिनांक २३ जून रोजी सकाळी ११ वाजता उच्च शिक्षणातील बदलत्या प्रतिमांची शक्यता आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित केला आहे.
वेबिनार मध्ये प्रमुख वक्ते म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ च्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन आपले विचार मांडणार आहेत. अशी माहिती “न्यूज अनकट” शी बोलताना एमआयटी – एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि प्रभारी कुलगुरू डॉ. मंगेश कराड यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे