सोन्याचा भाव वाढला, सर्वसामान्यांंनी सोनं घेण्याची स्वप्न बघायची परिस्थिती…..

पुणे, २९ जुलै २०२०: सर्वसामान्यांचा गरजा या फार कमी असतात. त्यांना गाडी आणि घरा यपेक्षा जास्त जर कशात जर रस असेल तर ते म्हणजे सोनं. महिलांचे सौंदर्य हे अधिक उजाळून टाकणारा असतो तो म्हणजे सोन्याचा दागिना. पण, हेच सोनं आत्ता सर्वसामान्यांच्या खिशाचा पलिकडे जाऊ पाहतंय. कोरोनाच्या काळात अनेकजण यामध्ये गंतवणूक करत आहेत. ज्यामुळे सध्या सोन्याचे भाव हे गगनभरारी घेत आहेत.

कोरोना संकटात सोने चांदीला चांगली मागणी असल्यामुळे यांच्या भावात चढ उतार पहायला मिळतोय. पण, अलिकडे उतार काय आला नाही आणि सोन्याचे भाव हे वाढतच चालले आहे. मुंबईत आजच्या घडीला सोन्याचे दर हे ५४ हजार ८२८ रुपये प्रति तोळा तेही जीएसटी सकट झाला आहे. गेल्या २४ तासात सोन्यांचा भाव हा ३ हजारांनी वाढाला आहे. पुण्यात ही सोने ५४ हजार तोळा तर चांदी ७० हजार किलो भेटत आहे.

आधीच कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्या गरजा भागवता भागवता नाकी नऊ येत आहे. त्यात आता सोनं घेऊन कुठेतरी थोडी पुंजी जमा करणा-यांच्या आवाक्या बाहेर हे भाव गेले असून, आता सर्वसामान्यांनी सोन्याचे स्वप्नचं बघायचे अशी परिस्थिती झाली आहे. तर येणा-या काळात सोन्याचे भाव हे अजून वाढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा