नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला संसदेत पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या पेहरावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी नरेंद्र मोदी संसदेत खास निळ्या रंगाचे जॅकेट घालून पोहोचले. हे जॅकेट सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथे आयोजित भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने हे जॅकेट पंतप्रधान मोदींना भेट देण्यात आले. हे जॅकेट २८ सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ते तयार केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १०० दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे लक्ष्य ठेवले आहे.
- काय सांगितले इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दरवर्षी १०० दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. या रिसायकल केलेल्या बाटल्यांपासून कपडे तयार केले जातील. चाचणी म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तज्ज्ञांनी हे जॅकेट तयार केले होते. जी पीएम मोदींना सादर करण्यात आली आहे. एकसमान जॅकेट बनवण्यासाठी एकूण २८ बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. कंपनीने दरवर्षी १०० दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. हे जॅकेट पेट्रोल पंपावरील सहाय्यकांना देण्यात येणार आहे.
- पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत
यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. कॉटनला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो तर पॉलिस्टरला डोप डाईंग केले जाते. यामध्ये पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. पीईटी बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची आयओसीची योजना आहे..
- आणखी काय आहे खास ?
- हे कपडे पूर्णपणे ग्रीन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
- या बाटल्या निवासी भागातून आणि समुद्रातून गोळा केल्या जातात.
- कपड्यांवर एक क्यूआर कोड आहे ज्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.
- टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी पाच ते सहा बाटल्या वापरल्या जातात.
- एक शर्ट बनवण्यासाठी १० बाटल्या आणि पेंट बनवण्यासाठी २० बाटल्या लागतात.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.