आज रात्री आठ वाजता प्रधानमंत्री देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली, दि. १२ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कोरोना संकट आणि लॉकडाऊन दरम्यान देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतील आणि कोरोना रोखण्यासाठी सरकारने घेतल्या गेलेल्या निर्णयाबद्दल ते सांगतील. यावेळी लॉकडाऊनवर एक महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली जाऊ शकते.

मिळालेल्या माहिती नुसार, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करू शकतात. या टप्प्यात लोकांना अधिक सवलती मिळतील. तसेच कामगारांचे स्थलांतर आणि लॉकडाऊन एक्झीट योजनेबाबतही पंतप्रधान मोदी चर्चा करू शकतात. या व्यतिरिक्त लोकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

काल झाली मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक:

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १६ रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाऊन विषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन पुढे नेण्याचे सुचवले.

या बैठकीची खास बाब म्हणजे सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला. सर्व मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. या बैठकीचे दोन भागात आयोजन करण्यात आले होते. पहिली फेरी दुपारी तीन वाजता सुरू झाली. प्रथम, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी आपला मुद्दा मांडला. उद्धव ठाकरेंनी देखील लॉकडाऊन कायम ठेवण्याबाबत मत मांडले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा