द केरळ स्टोरी चित्रपटाच्या बंदीवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी मांडले कठोर मत

मुंबई,३० एप्रिल २०२३: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी “द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले आणि “लव्ह जिहाद-एक संकल्पना” हा मुद्दा उपस्थित करून राज्याला धार्मिक अतिरेकी केंद्र म्हणून दाखवणाऱ्या संघ परिवाराचा प्रचार करत आहेत असे मत मांडले.”जातीयवादाची विषारी बीजे पेरून” राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवत संघ परिवार नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आणि मुख्यमंत्र्यांचा या वक्तव्यानंतर सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.

डीवायएसआय, काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी चित्रपटाचा प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मध्ये केरळमधील ३२ हजार महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांना दहशतवादी संघटनेने भरती केल्याचे दाखवण्यात आले. तो पाहिल्यावर अनेक ठिकाणी संतापाचे वातावरण पसरलं आणि त्यामुळेच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली.

चित्रपटाला विरोध सुरू झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी त्यांचे मत ठामपणे मांडले आहे. “हा चित्रपट पीडित मुलींच्या जीवनावर आधारित आहे. आम्ही सत्य दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. याला तुम्हाला लव्ह जिहाद म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता परंतु हे लोकांनी तयार केलेले राजकीय शब्द आहेत”,असे ते म्हणाले. तर या कथानकाच्या खोलात शिरताना या संदर्भात आम्ही किमान १०० पेक्षा जास्त मुलींना भेटलो आणि तेव्हाच लक्षात आलं की हा आकडा प्रत्यक्षात खूप मोठा आहे आणि तेव्हाच हा मुद्दा मांडण्याची गरज आम्हाला वाटू लागली.असेही त्यांनी सांगितले.

सुदीप्तो सेन यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली केरळ स्टोरी एका मुलीच्या सत्य घटनेवर आधारित आहे. जी धर्म परिवर्तन करून सिरीयाल जात होती. तिला तिची चूक समजली आणि ती अर्ध्या वाटेतून परत आली. आज ती अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहे. फक्त तीच नाही तर अनेक मुली अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहेत. आणि अशाच मुलींची कथा मांडण्यात आली आहे ज्यामध्ये धर्मांतराला बळी पडून त्या मुलींचा आयुष्य उध्वस्त झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा