इंदापूर, दि.२४ऑक्टोबर २०२० : इंदापूर तालुक्यातील प्रमुख दळणवळणाचा असलेला लोणी देवकर ते कळस मार्ग आता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. लोणी देवकर ते कळसा जवळपास १८ किलोमीटरचा रस्ता जागोजागी खड्डे पडल्यामुळे याठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात घडून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातच सध्या पाऊस वाहतोय तिचा हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावरून अनेक ऊस वाहतूक करणारी वाहने तसेच इतर प्रवासी दळणवळण करीत असतात या रस्त्यावर ठिक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्यामुळे सतत अपघात घडत असतात. तसेच रस्त्याच्या कडेला अनेक वृक्ष जीर्ण झालेली आहेत.
नागरिकांनी याबाबत संबंधित प्रशासनाकडे विनंती देखील केली आहे काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर एक मोठा वृक्ष कोसळला होता. मात्र सुदैवाने या घटनेने कोणतीही हानी न झाल्याने एक मोठा अनर्थ टळला होता. त्यामुळे लोणी देवकर ते कळस हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या बाबीर यात्रा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने या यात्रे अगोदर किमान रस्त्यांची डागडुजी करून घेण्याची मागणी स्थानिक प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी