ऋतिक – दीपिकाच्या ‘फायटर’ चित्रपटाची रिलीज डेट घोषित

मुंबई ,२९ ऑक्टोबर २०२२ : सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट ‘फायटर’ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटांमधून प्रेक्षकांना पहिल्यांदाच मोठा पडद्यावर ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चहात्यांचं लक्ष लागलं होतं. आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट भारतातील पहिला एरियल ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट ची भूमिका साकारणार असून, अनिल कपूर ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा