गोल पोस्ट Uncategorized कोरेगाव मूळमध्ये बरा झालेल्या रुग्णाचा अहवाल आला पुन्हा पॉझिटिव्ह

कोरेगाव मूळमध्ये बरा झालेल्या रुग्णाचा अहवाल आला पुन्हा पॉझिटिव्ह

उरुळी कांचन, दि. २३ जून २०२० : दि.२२ जून २०२० रोजी पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ येथील दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आल्यामुळे पूर्व हवेलीत पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. तर एक रूग्ण बरा होऊन घरी आल्यावर पुन्हा त्याची चाचणी केली असता पुन्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे एकूण दोनजण कोरोना पॉंझीटीव्ह आढळले आहे. असे उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी सांगितले.

या दोन रुग्णांपैकी एक महिला (वय ३६) कदमवाकस्ती येथील दवाखान्यात कामाला आहे. तर दुसरी व्यक्ती (वय २७) कोरोना होऊन बरी झाली होती. पण नंतर पुन्हा चाचणी केली असता पॉझिटिव्ह ती आली आहे. त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version