गोल पोस्ट इतर पर्यावरण लोणी काळभोर पालखी स्थळ येथे सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

लोणी काळभोर पालखी स्थळ येथे सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

लोणी काळभोर, दि. २३ जून २०२० : कदमवाक वस्ती येथे दि. २२ जून २०२० रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीतळावर देहू संस्थानाचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक मोरे आणि सिने अभिनेते वृक्षप्रेमी सयाजीराव शिंदे, व ग्रामपंचायत कदम वाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, ग्रामसेवक प्रवीण देसाई, तसेच लोणी काळभोर – कदम वाकवस्ती ग्रामपंचायतचे सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी लोणी काळभोरला पालखीचा मुक्काम असतो मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पालखी सोहळा दिंडी पायी चालत जाणार नाहीत. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी ज्याठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी थांबते त्या त्या ठिकाणी वृक्ष लागवड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याठिकाणी पालखी तळावर सयाजी शिंदे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत कदम वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, सदस्य स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version