दारुतून मिळणारा महसूल महत्वाचा की लोकांचे प्राण: अण्णा हजारे

नगर, दि.९ मे २०२० : राज्य सरकारने दारू विक्रीसाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा सगळीकडे फज्जा उडाला आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा ही दारूच्या दुकानांकडे शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे संसर्ग वाढून कोरोना ग्रस्तांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दारूची दुकाने सुरू करून सरकारला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की दारूपासून मिळणारा महसूल? असे वक्तव्य करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे कान टोचले आहेत.

दारू विक्रीला परवानगी मिळाल्यापासून पोलिसांवरील ताण वाढल्याचे दिसते आहे. त्यात अनेक घरात दारूवरून कलह देखील निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने दारूची दुकाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अविचारी आहे, याला ‘विनाश काले विपरित बुद्धी’ असे म्हणता येईल, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले़.

कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य पाहता, दारुचा जीवनावश्यक बाबीत समावेश होत नाही. तरीही दारुची दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे अधिक मोठा धोका होण्या अगोदर सरकारने या दारू विक्रीवर तोडगा काढावा, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा