अनेक वर्षापासून रखडलेला रस्ता झाला दुरुस्त

बारामती,१७ सप्टेंबर २०२० : बारामती मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला शिवाजी चौक ते गुनवडी व मळदला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती.ही दोन्ही गावे लवकरच बारामती नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण बारामती पालिकेच्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण करण्यात आले आहे.

दि.११ डिसेंबर २०१९ रोजी तरन्नुम सय्यद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे पाठपुरावा करत या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल कळविले होते. या भगतील परिसरात मोठी नागरी वस्ती वाढत असल्याने येथे लहान मोठे अपघात घडत होते. येथील नागरीक येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने वाहने हाकत होती. येथील नागरिकांनी सतत पालिकेकडे याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत.

सध्या बारामतीच्या विकासकामांच्या कामात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या असल्याचेही सय्यद यांनी पत्रात नमूद केले होते. शेवटी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.प्रभाग क्रमांक १९ मध्ये तरन्नुम सय्यद यांचे कौतुक होत आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा