रुग्णांचे मृत्यूदर कमी करण्यात रुग्णालयांची भूमिका महत्वाची: डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि.१७ मे २०२०: कारोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करुन रुग्णांचे मृत्यूदर कमी करण्यात शहरातील रुग्णालयाची भूमिका महत्वाची आहे. असे मत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील परिस्थितीच्या अनुषंगाने पुण्यातील प्रमुख ६० रुणालय प्रमुखासोबत वेबीनार प्रणालीद्वारे डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शनिवारी( दि.१६) रोजी संवाद साधला. या वेबीनार संवादप्रणालीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांच्या समवेत पुणे कोविड१९ कार्यबल गटाचे प्रमुख तथा समन्वयक सुधीर मेहता, कार्य बल गटाचे अध्यक्ष डॉ.दिलीप कदम, पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, पुण्यातील ६० रुग्णालय प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, शहरातील डॉ. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, इन्लक्स अँड बुद्राणी हॉस्पिटल आदी रुग्णालयामध्ये कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या कोरोनाबाधित रुग्णावर डॉक्टर तातडीने उपचार करत आहेत. त्याचे परिणाम सकारात्मक बाजू लक्षात घेता रुग्णांचे मृत्यूदर कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

रुग्णांची काळजी घेण्यात रुग्णालयातील डॉक्टर कोणतीही कसूर करीत नसल्याचे यावेळी विशेषत्वाने नमूद केले. शासनाच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाला गरजेनुसार आवश्यकत ती मदत करण्यात येत आहे,असल्याचे त्यांनी सांगितले .

मेहता यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. प्रशासनाच्या वतीने कमी वेळेत परिस्थिती हाताळून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना समाधानकारक आहे.

त्यामध्ये नागरिकांचे मास स्क्रिनिग, खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या करीता निर्माण केलेल्या पायाभूत सोयीसुविधा, प्लस ऑक्सिमीटर तपासणी यासारख्या विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा